रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात त्यांनी क्रमशः 12, 6 आणि 37 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यादीनुसार सामरी आणि लुंड्रा मतदारसंघातील आमदारांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये 5 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून, 3 अनुसूचित जाती(एससी) आणि अनुसूचित जमाती(एसटी)च्या 6 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यात दक्षिण छत्तीसगडमधल्या राजनांदगाव जागेवर मुख्यमंत्री रमन सिंह यांनी टक्कर देण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांना मैदानात उतरवलं आहे.सत्ताधारी भाजपा असलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या 90 उमेदवारांपैकी 78 जागांवरचे उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Chhattisgarh Assembly election 2018: काँग्रेसकडून 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 9:01 AM