रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी 12 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील 3 मतदारसंघांमध्ये सकाळी 8 ते 5 यावेळेत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.
Chhattisgarh Assembly Elections 2018 Live Updates :
- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान
- विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 47.18 टक्के मतदान
- दुपारी 1 पर्यंत 25.15 टक्के मतदान
- सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 16.24 टक्के मतदान झाले
- नक्षल प्रभावी सुकमा जिल्ह्यातील किस्तरम,पालेम आणि बेज्जीमध्ये मतदान सुरू
- सकाळी 10 वाजेपर्यंत 10.7 टक्के मतदान
- राजनंदगावातील कमला महाविद्यालयातील पिंक मतदान केंद्रावर तांत्रिक कारणांमुळे थांबलेलं मतदान पुन्हा सुरू
- निवडणूकआयोगाने महिलांसाठी विशेष बूथ तयार केले असून त्याला संगवारी असे नाव दिले आहे; यात अधिकाधिक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- 200संवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला.
- विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; राजनांदगावच्या ५ तर बस्तरच्या ३ जागांसाठी आज होणार मतदान