रायपूर : छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपली असून एकूण 70 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. तर छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी 12 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
मतदान प्रक्रियेदरम्यान केवळ 1 टक्के ईव्हीएम मशिन आणि 1.9 टक्के व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्याने बदलण्यात आल्या.