रायपूर- छत्तीसगडमधल्या निवडणुकीचे पडघम जसजसे वाजू लागलेत, तसतसे राजकीय पक्षांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यात आता काँग्रेस आमदाराची एक कथित ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऑडिओ क्लिप राज्याचे गृहमंत्री रामसेवक यांच्या आजारावर उपचार करणारे कंबल बाबा आणि काँग्रेस आमदार चिंतामणी महाराजांशी संबंधित आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे छत्तीसगडचं राजकारण ढवळून निघालं आहे.खरं तर या कथित क्लिपमधून कंबल बाबा लुंड्रा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चिंतामणी महाराज यांना भाजपामध्ये सहभागी होण्याची ऑफर देत असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्यांना मंत्रिपदाचंही आमिष देण्यात आलंय. या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कंबल बाबा म्हणतात, तुमच्या अटीनुसार तुम्हाला काहीही खर्च येणार नाही. तुम्हाला मंत्री बनवण्याची जबाबदारी आमची आहे.आता तुमची इच्छा...चिंतामणी महाराज- मी तिथे जाताच सर्व फोटो समोर येतील. त्यावर कंबल बाबा म्हणाले, तुमचा कुठेही फोटो आला तर जबाबदारी माझी असेल. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये कंबल बाबा यांनी छत्तीसगड काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रामदयाल उइके यांच्या भाजपा प्रवेशाबाबतही विधान केलं आहे. उइकेंनी 10 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं आश्वासनानंतर भाजपामध्ये प्रवेश केला, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. परंतु या क्लिपमध्ये काँग्रेसबरोबर विश्वासघात करणार नसल्याचंही चिंतामणी महाराज म्हणाल्याचं समोर आलं आहे.रमन सिंह बोलले, बाबांशी भाजपाचा संबंध नाहीरमन सिंह म्हणाले, कंबल बाब आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही. तर आमचे 65 आमदार जिंकून येतील. देशात अनेक बाबा असे फिरत आहेत. त्यांचे भाजपाशी काहीही देणे-घेणे नाही.
भाजपा प्रवेशासाठी काँग्रेस आमदाराला 10 कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर, ऑडिओ क्लिपने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 2:27 PM