शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

मृत्यूला हरवणारा हिराे; १०५ तासांनी ‘तो’ बोअरवेलमधून सुखरूप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 7:40 AM

बोअरवेलमध्ये १०५ तास मृत्यूशी झुंज देऊन ११ वर्षांचा राहुल सुखरूप बाहेर आला, तेव्हा कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.

रायपूर :

बोअरवेलमध्ये १०५ तास मृत्यूशी झुंज देऊन ११ वर्षांचा राहुल सुखरूप बाहेर आला, तेव्हा कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले. ही घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यत आले आले असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या मोठ्या ऑपरेशनच्या यशस्वीतेबद्दल टीममधील सर्वांचे कौतुक केले आहे. 

छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात शुक्रवारी बोअरवेलच्या खड्ड्यात राहुल पडला होता. ६० फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम काम करत होती. पिहरीद गावातील राहुल आपल्या घराजवळ खेळत असताना शुक्रवारी दुपारी बोअरवेलच्या खोल खड्ड्यात पडला. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच रात्री उशिरा ऑपरेशन सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र शुक्ला यांच्या नेतृत्वात प्रशासनाची टीम  गावात दाखल झाली होती.

या मोहिमेत १२० पोलीस, बांधकाम विभागाचे इंजिनिअर, एनडीआरएफचे ३२ कर्मचारी, एसडीआरएफचे १५ कर्मचारी आणि होमगार्डचे सात जवान दिवसरात्र मेहनत करत होते. या कामासाठी एक स्टोन ब्रेकर, तीन पोकलेन, तीन जेसीबी, दहा ट्रॅक्टर, तीन वॉटर टँकर आदी भली मोठी यंत्रणा सज्ज होती. 

मोहिमेत अधिकाऱ्यांची फौजया मुलाला बाहेर काढण्यासाठी रोबोटिक रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर बोगदा बनविण्याचे काम सुरू केले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शनिवारी गुजरातहून रोबोट इंजिनिअरला बोलविण्यात आले. ओडिशातून एनडीआरएफ टीमलाही बोलविण्यात आले. या मोहिमेत चार आयएएस, दोन आयपीएस, पाच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार एसडीओपी, पाच तहसीलदार आणि आठ पोलीस ठाणे प्रमुख सहभागी होते.

टॅग्स :Indiaभारत