नवी दिल्ली - सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल, असे अजब वक्तव्य राज्यातील विद्यमान विरोधी पक्षनेते टी. एस. सिंह देव यांनी केले आहे.ते म्हणाले की, २००३च्या निवडणुकांत रमणसिंग यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले नव्हते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यातआले नव्हते. निवडणुकानंतर भाजपनेही स्वयंवर आयोजितकरुनच मुख्यमंत्रीपदासाठी एका नेत्याची निवड केली. जे त्याराज्यात झाले ते छत्तीसगढमध्येही होईल.गेल्या पंधरा वर्षापासून छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्तेपासून वंचित आहे. प्रभू रामचंद्राने भोगलेल्या १४ वर्षे वनवासासारखाच हा कालावधी आहे असे सांगून टी. एस. सिंह देव म्हणाले की, हा वनवास संपवून प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणेपुन्हा आपल्या राज्यात परतले त्याचप्रमाणे काँग्रेसही १४ वर्षांचा वनवास संपवून यंदाच्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून छत्तीसगढमध्ये पुन्हा सत्तास्थानीयेणार आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याची निवड सीता स्वयंवराप्रमाणेच, काँग्रेस नेत्याने केले अजब वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 5:52 AM