रायपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पूर्ण झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती. तसेच मतदानावर बहिष्कार घालण्याची धमकी ग्रामस्थांना दिली होती. मात्र आमदार भीमा मंडवींच्या कुटुंबीयांनी घरावर दु:खाचे सावट असतानाही नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला.छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दांतेवाडामधील श्यामगिरी येथे नक्षलवाद्यांनी मंगळवारी आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करत आयईडी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात आमदार भीमा मंडवी, त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. भीमा मंडवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून आमदार भीमा मंडवींच्या पत्नीसह कुटुंबीयांनी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 1:51 PM