देशात अनेकविध घटना घडत असतात. काही घटनांमुळे सगळेच जण हैराण होतात. एका राज्यातही अशीच एक घटना घडली आहे. सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यासंदर्भात अखेर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका सरकारी नसबंदी शिबिरात हा प्रकार घडला आहे. (chhattisgarh govt order probe on sterilization of 101 women in seven hours)
Parle-G बनवणाऱ्या कंपनीविरोधात स्पर्धा आयोगाकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात असलेल्या नर्मदापूर गावात आयोजित नसबंदी शिबिरात एका सर्जनने सात तासात १०१ महिलांवर सर्जरी केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी या शिबिरामध्ये अनागोंदी कारभार सुरु असल्याचे वृत्त दिले होते. यानंतर आरोग्य विभागाने याची दखल घेत सर्जन आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
“मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल
तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल
सुरगुजा जिल्ह्यातील नर्मदापूर गावात सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते. तक्रारींची दखल घेत तपास सुरु करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजनेचे मुख्य सचिव डॉक्टर अशोक शुक्ला यांनी दिली. सरकारी सर्जनने एकूण १०१ सर्जरी केल्या. ज्या महिलांवर सर्जरी करण्यात आली त्यांची स्थिती सामान्य असल्याचे सांगितलं जात आहे. पण सरकारी नियमांनुसार, सर्जन दिवसात ३० सर्जरीच करु शकतात. नियमांचे पालन का केले नाही, याची माहिती घेण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.
“आम्हाला अडवू नका, परिणाम चांगले होणार नाहीत”; राकेश टिकैत यांचा थेट इशारा
दरम्यान, मोठ्या प्रमाणात महिला आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला सर्जरीसाठी विनंती केली, असा दावा सर्जनने केला आहे. यासंदर्भात तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली असून, चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर कोणी दोषी आढळले तर कठोर कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यापूर्वी, सन २०१४ मध्ये बिलासपूर जिल्ह्यात एका नसबंदी शिबिरात एका दिवसांत ८३ महिलांची नसबंदी करण्यात आली होती. यातील १३ महिलांचा मृत्यू झाला होता.