- योगेश पांडे विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. विधानसभेत तब्बल ७५ टक्के जागांवर विजय मिळविणाऱ्या काँग्रेसचा विजयरथ भाजपाने थांबविला आहे. काँग्रेसचे उमेदवार अवघ्या दोन जागांवर आघाडीवर होते.विधानसभेतील चुकांपासून धडा घेत भाजपाने यंदा सर्वच उमेदवार बदलत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विधानसभेत ९० पैकी १५ जागांवर विजय मिळविणाºया भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांच्या नेतृत्वात लोकसभेत दणदणीत यश मिळाले आहे. अरुण साव (बिलासपूर), गुहाराम आजगले (जांजगिर),गोमती साई (रायगड), सुनील सोनी (रायपूर), संतोष पांडे (राजनांदगाव), रेणुका सिंग (सरगुजा) या भाजपच्या सहा उमेदवारांनी तर लाखाहून अधिक मताधिक्य मिळविले. तर इतरांनीदेखील सन्मानजनक मतं मिळविली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसला दारुण अपयशाचा सामना करावा लागला आहे. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसची एक जागा वाढली असली तरी ही पक्षाची नामुष्कीच मानली जात आहे. छत्तीसगडमध्ये पाच महिन्यांतच जनतेने सत्ताधारी काँग्रेसला नाकारले आहे. भाजपाने नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळात जाऊन मतदारांशी संपर्क केला. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक मुद्यांंना प्रचारात स्थान देण्यावर भर दिला.निकालाची कारणेविधानसभेतील पराभवानंतर प्रदेश नेतृत्वात बदल करण्यात आला. तसेच संघटन मजबुतीवर विशेष भर देण्यात आला.जनतेमधील नाराजी लक्षात घेऊन सर्व खासदारांचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्या प्रचाराची ‘जादू’ चालली.
छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:02 AM