Pension Hike News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पेन्शचा मुद्दा चर्चेत आला आहे. जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनवरुन कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. यातच आमदार खासदारांची पेन्शन बंद करण्याची मागणीही सामान्य नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, तिकडे छत्तीसगड सरकारने माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये भरगोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेन्शन 35,000 वरुन 58,300 रुपये होणारछत्तीसगड सरकारने विधानसभेमध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर केले असून, यानुसार पेन्शन आणि प्रवासाचा भत्ता वाढवला जात आहे. या विधेयकानुसार, माजी आमदारांचे पेन्शन 35,000 रुपयांवरून 58,300 रुपयांवरून वाढविले जाईल. याशिवाय, माजी आमदाराला त्याच्या सदस्यत्वाच्या पहिल्या मुदतीनंतर (पाच वर्षांपेक्षा जास्त) दरमहा दरमहा एक हजार रुपये अतिरिक्त पेन्शन मिळविण्याचा अधिकार असेल.
भत्ता 8 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढलायासह, रेल्वे किंवा हवाई प्रवासासाठी विद्यमान आमदारांना वार्षिक 8 लाख रुपये मिळणारा भत्ता आता 10 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, माजी आमदारांसाठी हा भत्ता वार्षिक 4 लाख वरुन 5 लाखांपर्यंत वाढला आहे. याशिवाय, माजी आमदारांना 10 हजार रुपये टेलिफोन भत्ता आणि 15 हजार रुपये इतर भत्ता मिळेल.
तिजोरीवर भार वाढणारगेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री, विधानसभा सभापती, मंत्री आणि आमदार यांचे पगार वाढविण्यासाठी विधानसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आले होते. छत्तीसगड विधानसभेमध्ये 90 सदस्य आहेत. आता या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 16.96 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आ