छत्तीसगडच्या रायगड येथे सोशल मीडिया स्टार २२ वर्षीय लीना नागवंशी हिनं आत्महत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार तिनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस घटना स्थळावर पोहोचण्याआधीच कुटुंबीयांनी लीला हिचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवला होता.
रायगडच्या केलो बिहार कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चक्रधर नगर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवलं आहे. पोस्टमार्टच्या रिपोर्टनंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकेल. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
कोण आहे लीना नागवंशी?लीना सोशल मीडिया स्टार होती आणि नेहमी चर्चेत असायची. बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या नागवंशी सोशल मीडियात सक्रीय होती. तिचे इन्स्टाग्रामवर १० हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स होते.
विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय लीना नावाच्या तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं आम्ही घटनास्थळावर पोहोचलो, अशी माहिती चक्रधर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश बोहिदार यांनी सांगितलं. पोलीस जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा कळालं की लीना हिनं ओढणीनं गळफास घेतला आहे. पण कुटुंबीयांना ती जीवंत असल्याचं वाटलं म्हणून त्यांनी तातडीनं तिला खाली उतरवलं. डॉक्टरांनी ती मृत झाल्याचं घोषीत केलं आहे आणि मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरुन तिचा मोबाइल जप्त करण्यात आला असून कोणतीही सुसाइट नोट आढळून आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. लीनाच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस तपास सुरू आहे.