Chhattisgarh Telangana Election 2023 Result Live: छत्तीसगडमध्ये भाजप स्पष्ट बहुमतात, तेलंगणाच्या जनतेनं बीआरएसला नाकारत काँग्रेसला दिला हात
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:17 AM2023-12-03T08:17:53+5:302023-12-04T01:58:08+5:30
Chhattisgarh, Telangana And Mizoram Assembly Election Result 2023 Live: या निकालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत, पक्ष कार्यकर्त्यांना न थकता कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. तर विरोधी पक्षाचे नेते अथवा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही, जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करत, विचारधारेची लढाई सुरूच राहील, असे म्हटले आहे.
Chhattisgarh, Telangana And Mizoram Assembly Election Result 2023 Live: छत्तीसगड, तेलंगाना, राजस्थान आणि मध्य प्रदेश, विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथे भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत.
तेलंगणातील जनतेने बीआरएसला नाकारत काँग्रेसच्या हाती राज्याची धुरा दिली आहे. येथे 119 जागांपैकी 64 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर बीआरएस 29 जागा मिळाल्या आहेत. या खेरीज भाजपला 8, एआयएमआयएमला 7 तर इतरांना 1 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन मोठ्या राज्यांत भाजपचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे.
या निकालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत, पक्ष कार्यकर्त्यांना न थकता कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, "मोदीच्या गॅरंटीची गाडी, देशाच्या यशस्वीतेची गॅरंटी बनेल, ही देखील मोदीची गॅरंटी आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 'जिथे इतरांकडून आशा संपते, तिथे मोदीची गॅरंटी सुरू होते'," असेही मोदी यांनी म्हटले आहे. तर विरोधी पक्षाचे नेते अथवा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही, जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करत, विचारधारेची लढाई सुरूच राहील, असे म्हटले आहे.
LIVE
03 Dec, 23 : 11:39 PM
आज चार राज्यांचे निकाल लागले, जे जिंकले त्यांचे अभिनंदन; अगदी मोकळ्या मनाने करतो - उद्धव ठाकरे
आज चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ते बघतील. पण जे-जे जिंकले त्या सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकायला हवी आणि ती टिकावी यासाठीच आपण लढत आहोत. 2024 ची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आता जशा निवडणुका होत आहेत. तशाच त्या 2024 नंतरही होत राव्यात. हे जनतेने ठरवावे. पूर्वी एक म्हण होती यथा राजा तथा प्रजा, तशीच लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण असावा. पण ते ठरवण्याचा अधिकार राहातो की जातो? असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभे राहिलो आहोत.
03 Dec, 23 : 08:42 PM
मल्लिकार्जुन खरगेंनी जनतेचे आभार मानले
तेलंगणातील जनतेकडून मिळालेल्या जनादेशाबद्दल त्यांचे आभार - मल्लिकार्जुन खरगे
03 Dec, 23 : 07:13 PM
छत्तीसगडमध्ये भाजपने मारली मुसंडी
छत्तीसगडमध्ये भाजप ६० जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर असून भाजप सत्तेच्या जवळ पोहोचली आहे.
03 Dec, 23 : 05:45 PM
तेलंगणात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत पोलिसांवर कारवाई
भारतीय निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता आणि संबंधित आचार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे.
तेलंगणाचे पोलीस महासंचालक संजय जैन, राज्य पोलीस नोडल अधिकारी, तेलंगण आणि महेश भागवत, नोडल यांनी तेलंगणाच्या विधानसभेच्या सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार अनुमुला रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे उमेदवारांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देवून भेट घेतली.
#UPDATE | The Election Commission of India has suspended Anjani Kumar, Director General of Police Telangana for violation of the Model Code of Conduct and relevant conduct rules: Sources
— ANI (@ANI) December 3, 2023
The Director General of Police Telangana along with Sanjay Jain, State Police Nodal Officer,… https://t.co/FGltWV2Bxepic.twitter.com/2m7XpbjBqj
03 Dec, 23 : 04:13 PM
तेलंगणात काँग्रेस तर छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर
तेलंगणातील आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस ६३ जागांवर आघाडीवर असून बीआएसने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे . तर भाजपने १० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसची सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर छत्तीसगडमध्ये भाजपने ५६ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस ३२ जागांवर पुढे आहे, छत्तीसगडमध्ये भाजपची सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
03 Dec, 23 : 03:29 PM
बीआरएसचे नेते केटीआर राव यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले
"बीआरएसला सलग दोन वेळा सरकार दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभारी आहोत. आजच्या निकालाबद्दल दु:खी नाही, परंतु तो आमच्यासाठी अपेक्षित नसल्यामुळे नक्कीच निराश झालो आहोत. पण आम्ही हे शिकण्याच्या दृष्टीने आमच्या वाटचालीत घेऊ . जनादेश जिंकल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन, असं ट्विट" केटीआर राव यांनी केले.
Grateful to the people of Telangana for giving @BRSparty two consecutive terms of Government 🙏
— KTR (@KTRBRS) December 3, 2023
Not saddened over the result today, but surely disappointed as it was not in expected lines for us. But we will take this in our stride as a learning and will bounce back…
03 Dec, 23 : 02:53 PM
तेलंगणात काँग्रेसचा जल्लोष
तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी आणि पक्षाचे नेते डीके शिवकुमार आणि इतरांनी हैदराबादमध्ये राज्य निवडणुकीत पक्षाच्या आघाडीचा आनंद साजरा केला.
#WATCH | Telangana Congress chief Revanth Reddy along with party leaders DK Shivakumar and others celebrates the party's lead in the state elections, in Hyderabad pic.twitter.com/jW0eRTSF4s
— ANI (@ANI) December 3, 2023
03 Dec, 23 : 01:56 PM
रेवंथ रेड्डी तेलंगणचे मुख्यमंत्री?
रेवंथ रेड्डी काँग्रेस कार्यालयात दाखल झाले असून, कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
03 Dec, 23 : 01:00 PM
मुख्यमंत्री भूपेश बघेल १४५२ मतांनी आघाडीवर
छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार भूपेश बघेल हे पाटणमधून १४५२ मतांनी आघाडीवर असून, मतमोजणीच्या पाचव्या फेरीनंतर त्यांनी आतापर्यंत एकूण २६८५४ मते मिळवली आहेत.
03 Dec, 23 : 12:07 PM
तेलंगणात मुख्यमंत्री कार्यालयासमोर शुकशुकाट
तेलंगणमधील सुरुवातीचे कल पाहता काँग्रेस आघाडीवर असून, बीआरएस बऱ्याच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कार्यालयासमोर शुकशुकाट आहे. मुख्यमंत्री केसीआर शासकीय निवासस्थानी आहेत.
03 Dec, 23 : 12:07 PM
तेलंगणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
तेलंगणमध्ये सुरुवातीचे कल पाहता काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेस ६५, बीआरएस ३९, भाजप १०, एमआयएम ०३ आणि अन्य ०२ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून, प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी हैदराबाद रोड शो केला.
03 Dec, 23 : 11:44 AM
भाजप तीन राज्यात बहुमताने सरकार स्थापन करेल
सुरुवातीचे जे कल येत आहेत, त्यात भाजपला स्पष्ट पाठिंबा असल्याचे दिसत आहे. जनतेचा रोष मतदानातून दिसून आला. भाजप तिन्ही राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वास छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी व्यक्त केला.
03 Dec, 23 : 11:36 AM
छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, आताचे कल काय सांगतात?
छत्तीसगडमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसत असून, आताच्या कलानुसार भाजप ५० जागा, काँग्रेस ३७ आणि अन्य ३ जागांवर आघाडीवर आहेत.
03 Dec, 23 : 11:31 AM
तेलंगणमध्ये काँग्रेसला बहुमत? बीआरएसला धोबीपछाड!
तेलंगण विधानसभा निवडणूक निकालात धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. आतापर्यंत आलेले कल पाहता काँग्रेस ६५ जागांसह आघाडीवर आहे. तर सत्ताधारी बीआरएस पक्ष ३९ जागा, भाजप ९ जागा, एमआयएम ४ जागा आणि अन्य २ जागांवर आघाडीवर आहेत.
03 Dec, 23 : 11:23 AM
छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळेल
छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळेल आणि सरकार स्थापन होईल. काँग्रेस सरकारने जनतेला लुटण्याचे काम केले. पण जनतेने मतपेटीतून उत्तर दिले, असे भाजप प्रभारी नितीन नबीन यांनी म्हटले आहे.
03 Dec, 23 : 11:21 AM
तेलंगणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
तेलंगणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका बॅनरवर असलेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि नेते तसेच खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.
03 Dec, 23 : 11:14 AM
गोशामहलमधून टी.राजा आघाडीवर
तेलंगणात गतवर्षी विजयी झालेले भाजपचे एकमेव आमदार टी. राजा यंदाही निवडणुकीच्या मैदानात आहेत. गोशामहल मतदारसंघातून टी.राजा आघाडीवर असून निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पहिल्या २ राऊंडमध्ये त्यांनी ९९२३ मतांची आघाडी घेतली आहे. येथे भारत राष्ट्र समितीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे.
03 Dec, 23 : 11:08 AM
मुख्यमंत्री भुपेश बघेल पिछाडीवर
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली असून विद्यमान १० मंत्री पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री भुपेश बघेल हेही पाटन मतदारसंघात पिछाडीवर आहेत.
03 Dec, 23 : 10:34 AM
लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार?
लोकमत निवडणूक विश्लेषण
03 Dec, 23 : 10:21 AM
तेलंगणात काँग्रेसचा विजयी जल्लोष
तेलंगणात काँग्रेसने विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर समर्थकांनी लाडू वाटून ४७ जागांवर आघाडीवर असल्याचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी, बाय बाय.. केसीआर.. अशी घोषणाबाजीही केली.
#WATCH | Celebrations at Telangana Congress office in Hyderabad as early trends show lead on 47 seats for the party; party cadre chant "Bye. bye KCR"
— ANI (@ANI) December 3, 2023
BRS leading on 26 seats in early trends, as per ECI. pic.twitter.com/vyhCSqifJH
03 Dec, 23 : 10:17 AM
छत्तीसगडमध्ये आता काँग्रेस-भाजपात अटीतटीचा सामना
छत्तीसगडमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी निकाल हाती येत असून सुरुवातीला मोठी आघाडी घेतलेल्या काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. येथे काँग्रेस आणि भाजपात अटीतटीचा सामना होत असल्याचे दिसून येते. काँग्रेस ४९ तर भाजपा ४१ जागांवर आघाडी घेत असून हे आकडे खाली-वरी होत आहेत.
03 Dec, 23 : 09:52 AM
तेलंगणात विजयी आमदारांसाठी लक्झरी बस सज्ज
Telangana | Luxury buses have been stationed at Hyderabad's Taj Krishna. pic.twitter.com/1hJsAsfJrd
— ANI (@ANI) December 3, 2023
03 Dec, 23 : 09:19 AM
मोहम्मद अजहरुद्दीन आघाडीवर
काँग्रेस उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन ज्युबिली हिल्स मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते आघाडीवर असल्याचे दिसून येत. सुरुवातीच्या आकडेवारीवरुन अजहरुद्दीने आघाडीवर असल्याचे समजते
03 Dec, 23 : 09:13 AM
तेलंगणात काँग्रेसने घेतली आघाडी, बीआरएसची पिछेहाट
तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस ६० जागांवर आघाडीवर असून बीआरएस ३६ जागांवर आघाडी घेत आहे. भाजपला ६ जागांवर आघाडी असल्याचे दिसते.
03 Dec, 23 : 08:39 AM
तेलंगणात आम्ही पुन्हा जिंकू - के. कविता
आम्ही चांगलं काम केलंय, तेलंगणातील लोकांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू, असा विश्वास तेलंगणातील बीआरएसच्या आमदार आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी व्यक्त केला आहे.
#WATCH | On counting day, BRS MLC K Kavitha says, "We are very confident that we will win again with the blessings of the people of Telangana." pic.twitter.com/SQPYtBev1w
— ANI (@ANI) December 3, 2023
03 Dec, 23 : 08:32 AM
छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल अन् रमणसिंह यांच्या लढतीकडे लक्ष
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी ११८१ उमेदवार मैदानात उतरले असून ७६.३१ टक्के मतदान झाले आहे. या सर्व उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल आज लागणार आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी.एस.सहदेव आणि माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
03 Dec, 23 : 08:25 AM
तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काँटे की टक्कर
तेलंगणात मतमोजणीला सुरुवात झाली असून काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सुरुवातीलाच समोर येत असलेल्या आकडेवारीत काँग्रेस ३ तर बीआरएस २ जागांवर आघाडी घेताना दिसून येत आहे. भाजप एका जागेवर आघाडी घेत असल्याचं चित्र आहे.