छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने मोठी बाजी मारली आहे. टीएस सिंहदेव यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री म्हणून टीएस सिंह देव यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिली.
सीमेवर परिस्थिती बिघडली तर संबंध सुधारणार नाहीत, एस जयशंकर यांनी चीन-पाकिस्तानला फटकारलं
टीएस सिंहदेव हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आणि कार्यक्षम प्रशासक आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सेवेचा राज्याला मोठा फायदा होणार आहे. आम्हाला खात्री आहे की छत्तीसगडमधील जनता खर्गे जी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला प्रचंड बहुमताने निवडून देईल.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल टीएस सिंहदेव यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, आम्ही तयार आहोत. महाराज साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
टीएस सिंहदेव कोण आहेत?
त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव म्हणजेच टीएस सिंह देव हे सुरगुजा राजघराण्यातील आहेत. ते या राजघराण्याचा 118वे राजा आहेत. लोक त्यांना फक्त टीएस बाबा म्हणून संबोधतात.
प्रयागराजमध्ये जन्मलेल्या टीएस देव यांनी भोपाळच्या हमीदिया कॉलेजमधून एमए इतिहासाचे शिक्षण घेतले, मात्र छत्तीसगडमधून राजकारणाला सुरुवात केली. 1983 मध्ये त्यांची अंबिकापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि येथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते सध्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत.