रायपूर- छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते, जनता काँग्रेस छत्तीसगडचे अध्यक्ष अजित जोगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत भाजपाची लाट कुठेही दिसत नाही. काँग्रेसनं जवळपास 50हून अधिक जागांवर पुढे आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता काँग्रेस छत्तीसगडचे नेते अजित जोगी यांनी पक्षानं समाधानकारक काम केल्याचं म्हटलं आहे. जर काँग्रेस आणि भाजपाशिवाय कुठल्या पक्षाला जागा मिळाल्या असल्यास तो आमचा पक्ष ठरेल.फक्त दोन महिन्यात आमच्या पक्षाला जनतेचं चांगलं समर्थन मिळालं आहे. आमच्या पक्षामुळे जनतेला तिसरा पर्याय मिळाला आहे. भाजपाविरोधात राज्यात वातावरण असल्याचा काँग्रेसला फायदा पोहोचला आहे. छत्तीसगडमध्ये जोगी आणि मायावती यांच्या पक्षाची आघाडी होती. अजित जोगी यांना दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या रमण सिंह सरकारचा राज संपुष्टात आला आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण, आम्ही फक्त पर्याय ठरलो- अजित जोगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:18 PM