ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. २३ - सोशल मीडियाचा गैरवापर करून व्हॉट्सअॅपवर एका पोलिसाविरोधात मेसेज टाकल्याप्रकरणी एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केल्याची घटना छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे घडली. प्रभात सिंह असे त्याचे नाव असून पोलिसांनी केलेला अन्याय आणि बनावट चकमकींना वाचा फोडल्यामुळेच त्याला ही अटक करण्यात आल्याचा आरोप प्रभात सिंहच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान मंगळवारी प्रभातला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभातने पोलिस व पत्रकारांच्या एका ग्रुपवर बस्तरमधील पोलिस महासंचालकांवर टीका करणारा मेसेज टाकत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सोमवारी प्रबात सिंहची चौकशी सुरू केली व नंतर त्यावा अटक केली.
दरम्यान आपल्या अशिलाने कोणतीही अभद्र भाषा वापरली नव्हती, उलट त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनाच त्याने प्रत्युत्तर दिले, असे प्रभात सिंहच्या वकिलाने स्पष्ट केले.
बस्तर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रकारांना करण्यात येणारी अटक वा त्यांना मिळणा-या धमक्यावरून वाद सुरू आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी २ पत्रकारांना अटक केली होती, ते अद्यापही तुरूंगातच आहेत.
Dantewada-based journalist arrested y'day for allegedly posting message against a Police officer on a WhatsApp group pic.twitter.com/KvcqHKh3EB— ANI (@ANI_news) March 23, 2016