CM बघेल यांनी RSSची तुलना नक्षलवाद्यांशी केल्यानं वाद, प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी दिलं थेट प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:19 AM2021-10-14T09:19:52+5:302021-10-14T09:21:32+5:30
"गेल्या 96 वर्षांत संघाची नोंदणी, बायलॉज, सदस्यता सूची कुठे आहे, हे विचारण्याची आपली हिंमत आहे? भीती वाटते, की आपल्या सारखी अवस्था इतर जहालमतवाद्यांची न होवो?”
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची (आरएसएस) तुलना नक्षलवाद्यांशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर भोपाळच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर (Pragya Singh Thakur) यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यवर पलटवार केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकुर बुधवारी म्हणाल्या, आज हिंदू आणि देश हा आरएसएसमुळेच सुरक्षित आहे. (Pragya Thakur On RSS)
हा तर देशाचा अपमान - काँग्रेस
प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर, त्यांचे वक्तव्य म्हणजे, भारतीय सैनिकांचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यासंदर्भात, काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की “प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मते आरएसएसमुळे देश सुरक्षित आहे! मग आपल्या सीमेवर उभे असलेले सर्व धर्मांच्या रेजिमेंटचे शूर आणि शहीद सैनिक भ्याड आणि देशद्रोही आहेत? गेल्या 96 वर्षांत संघाची नोंदणी, बायलॉज, सदस्यता सूची कुठे आहे, हे विचारण्याची आपली हिंमत आहे? भीती वाटते, की आपल्या सारखी अवस्था इतर जहालमतवाद्यांची न होवो?”
बकौल प्रज्ञासिंह ठाकुर देश सुरक्षित है तो RSS के कारण! क्या हमारी सीमा पर सभी धर्मों की रेजिमेंट के बहादुर व शहीद सैनिक बुज़दिल व गद्दार हैं? यह पूछने की हिम्मत है आपमें कि 96 सालों में संघ का पंजीयन,बायलॉज,सदस्यता सूची कहाँ है, डर है कहीं आप जैसा हश्र अन्य अतिवादियों का न हो? pic.twitter.com/ax305TQMll
— KK Mishra (@KKMishraINC) October 13, 2021
मोहन भागवत म्हणाले होते, वीर सावरकरांची छबी खराब करण्याचा प्रयत्न -
तत्पूर्वी, सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, आजही भारतात वीर सावरकरांसंदर्भात माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.