ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निखाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह चौघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ठोठावली आहे.
बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल आणि ललिता लक्ष्मणन यांना काल (दि.24) विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यांच्यावर सीबीआयने गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक, खोटी कागदपत्रे बनविणे असे आरोपपत्र दाखल केले होते. तसेच, बंगळुरुमध्ये 1998-99 साली पोस्टपोर्ट अधिकारी रहाटे, शहा आणि लक्ष्मणनच्या मदतीने छोटा राजनने मोहन कुमार अशा नावाने बनावट पासपोर्ट मिळवला होता असा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता. दरम्यान, याप्रकरणी या चौघांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर आज झालेल्या सुनावणीत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी 15, 000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
छोटा राजन याच्यावर भारतात दहशतवादी कृत्य, खून, अपहरण, तस्करी अशाप्रकारचे 85 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये इंडोनेशियाच्या पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याचे इंडोनेशियातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. सध्या तो सीबीआयच्या ताब्यात आहे.
The court also imposed a fine of Rs 15,000 on each of them.— ANI (@ANI_news) April 25, 2017
Chhota Rajan and three others awarded seven years jail term in a fake passport case, by a Delhi court. pic.twitter.com/PPwJrzcAru— ANI (@ANI_news) April 25, 2017