नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आता एक वर्ष उलटून गेले आहे. दरम्यान, आता वर्षभरानंतर कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, काश्मिरी पक्षांच्या या जाहीरनाम्यास काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे.काश्मिरी पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक संयुक्त निवेदन दिले असून, त्या माध्यमातून राज्यात कलम ३७० लागू करण्याची आणि राज्यातील पूर्वस्थिती पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पक्षांच्या या मागणीस पी चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या सहा काश्मिरी पक्षांना सॅल्युट ठोकला आहे.चिदंबरम यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून त्यात ते म्हणतात की, कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकजूट झाले्ल्या मुख्य प्रवाहातील पक्षांमधील ऐक्य आणि हिंमतीला माझा सलाम. आता तुम्ही या मागणीसाठी ठाम राहा. स्वयंभू राष्ट्रवाद्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. जे इतिहास वाचत नाहीत. तर इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विचार करू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा