'मलाही पंतप्रधानांना हेच सांगायचंय' म्हणत चिदंबरम यांनी मोदींचं 7 वर्षांपूर्वीचं 'ते' ट्विट केलं रिट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:03 PM2020-09-02T17:03:45+5:302020-09-02T17:08:35+5:30
माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट आलेले असताना त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम दिसून आला आहे. देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात (GDP) 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविण्यात आली आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नरेंद्र मोदींचं सात वर्षापूर्वीचं म्हणजेच 2013 मधील एक ट्विट चिदंबरम यांनी रिट्वीट केलं आहे. तसेच यासोबतच मलाही पंतप्रधानांना हेच सांगायचं आहे असं देखील म्हटलं आहे. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींनी 30 नोव्हेंबर 2013 रोजी ट्विट केलेल्या ट्विटकडे मोदीचंच लक्ष वेधलं आहे. "मलाही आदरणीय पंतप्रधानांना हेच सांगायचं आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 2013 मध्ये मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था व रोजगारासंदर्भात एक ट्विट केलं होतं.
I have to say the same thing to the Honourable Prime Minister! pic.twitter.com/reNmp84mRu
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 2, 2020
"अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. राजकारण करण्यापेक्षा अर्थशास्त्राला जास्त वेळ द्या. चिदंबरमजी, हातांना रोजगार देण्याकडे लक्ष द्या" असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्याचं हेच ट्विट आता चिदंबरम यांनी रिट्वीट केलं आहे. राहुल गांधी यांनीही पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. 'मोदी मेड डिझास्टर' म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संकटांमुळे देश अडचणीत असल्याचं म्हटलं आहे. या सोबत सहा मुद्दे सांगितले आहेत. 23.9 टक्क्यांनी घटलेला जीडीपीचा दर, 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये दररोज होणारी वाढ आणि भारताच्या सीमावर शेजारच्या देश करत असलेली घुसखोरी या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे.
राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले...https://t.co/RzFj0sSAKH#RahulGandhi#Congress#NarendraModipic.twitter.com/XaTFQZyZ41
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2020
केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहिचे आकडे जाहीर केले आहेत. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती. देशात लॉकडाऊन असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात सारे काही बंद होते. यामुळे अर्थव्यवस्थाच ठप्प झाली होती. जूनमध्ये याला थोडा वेग आला होता. यामुळे रेटिंग एजन्सी आणि अर्थतज्ज्ञांनी जून तिमाहीमध्ये जीडीपीदरात 16 ते 25 टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.
नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'वरून साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/gG3RCK6WVj#Congress#RahulGandhi#NarendraModi#ManKiBatpic.twitter.com/9KwccdmG9V
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ
शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली
कडक सॅल्यूट! 25 किमी तब्बल 8 तास पायी प्रवास करून ITBP जवानांनी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला मृतदेह
'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध