शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चिदम्बरम यांचा दसराही तिहार तुरुंगामध्येच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:51 AM

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे १४ आॅक्टोबरपर्यंत मत मागविले आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे १४ आॅक्टोबरपर्यंत मत मागविले आहे. तशी नोटीस न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी जारी केली. त्यामुळे चिदम्बरम यांना दसराही कारागृहातच घालवावा लागेल.चिदम्बरम यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवले आहे. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून, तिची पुढील सुनावणी १५ आॅक्टोबर रोजी होणार आहे.चिदम्बरम यांना सीबीआयने २१ आॅगस्ट रोजी अटक केली होती. चिदम्बरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आपल्या अशिलाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने तीन निकष तपासून पाहिले होते. ते विदेशात पळून जाण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाही, असे न्यायालयाचे मत झाले. मात्र ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, असे वाटल्याने उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ईडीने मनीलाँड्रिंग प्रकरणात त्यांना अद्याप अटक केलेली नाही हेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय