शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुख्य लेखा अधिकार्‍यांनी आक्षेप नोंदवायला सांगतात लेखाधिकार्‍याचा आरोप : जि.प.अर्थ विभागातील कलह चव्हाट्यावर

By admin | Published: March 23, 2016 12:09 AM

जळगाव- मुख्य लेखा व वित्त अधिकारी नेहमीच चुकीचे अभिप्राय नोंदवायला सांगतात. त्यांची तक्रार झाली तर ते कनिष्ठ अधिकार्‍यांवर खापर फोडतात व पदाधिकार्‍यांकडेही कनिष्ठ अधिकार्‍यांविषयी तक्रार करतात, असा आरोप जि.प. वित्त विभागातील लेखाधिकारी अरुण पवार यांनी आपल्या खुलाशात केला आहे.

जळगाव- मुख्य लेखा व वित्त अधिकारी नेहमीच चुकीचे अभिप्राय नोंदवायला सांगतात. त्यांची तक्रार झाली तर ते कनिष्ठ अधिकार्‍यांवर खापर फोडतात व पदाधिकार्‍यांकडेही कनिष्ठ अधिकार्‍यांविषयी तक्रार करतात, असा आरोप जि.प. वित्त विभागातील लेखाधिकारी अरुण पवार यांनी आपल्या खुलाशात केला आहे.
जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी शिफारस केलेल्या शेळगाव व देऊळगाव येथील विविध कामांच्या फायली वित्त विभागात अडकल्याची तक्रार सोमवारी आली होती. त्यासंदर्भात प्राथमिक चौकशीअंती फायली लेखाधिकारी पवार यांनी दिलेल्या अभिप्रायामुळे परत गेल्याचे समोर आले. यासंदर्भात अध्यक्ष यांनी पवार यांच्याकडून लेखी खुलासा मागविला आहे.
त्यात पवार यांनी म्हटले आहे की, शेळगाव व देऊळगाव येथील कामांच्या फायलींसोबत मक्तेदाराच्या करारनाम्याची स्वाक्षरी नव्हती. पण नियम लक्षात घेता मी या फायली स्वीकृत करण्याची शिफारस केली, त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मी केलेली शिफारस खोडायला सांगितले व करारनाम्यावर स्वाक्षरीसंबंधीचा आक्षेप नोंदवायला लावला. इतर अनेक फायलींसंबंधीही त्यांनी शिफारसी खोडायला सांगितले आहेे. यासंबंधी चौकशी करावी. मी फायली अडकवित नाही. फायलींची पडताळणी सक्षम अधिकार्‍यातर्फे करावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.

समाज कल्याण विभागाची वित्त विभागाबाबत तक्रार
वित्त विभागाकडून फायलींची अडवणूक केली जाते, असा आरोप समाज कल्याण विभागातील बी.एस.चौधरी, ए.ए.होरशीळ, व्ही.टी.बाविस्कर, बी.डी.भोई, एम.डी.भिंगारे यांनी एका निवेदनात केला असून, हे निवेदन त्यांनी सीईओंकडे दिले आहे. यासंबंधी मंगळवारी कर्मचारी व अधिकारी सीईओंना जाऊन भेटले व त्यांनी वित्त विभागाकडून होणार्‍या अडवणुकीची माहिती दिली. वित्त विभागातील कनिष्ठ लेखाअधिकारी नेमाडे हे फायली जाळून टाका, माझ्या टेबलावर आणू नका, असे म्हणाले. या विभागाकडून वित्तीय नियमानुसार आक्षेप नोंदविले जात नाहीत. ते प्रशासकीय आक्षेप नोंदवितात. यामुळे निधी खर्चासंबंधी अडचणी येतात, अशी तक्रारही या कर्मचार्‍यांनी केली आहे.