नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार अतिवरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी गुरुवारी त्यांच्याशी चर्चा केली.जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ या न्यायमूर्तींशी मिश्रा यांनी न्यायालयाचे कामकाज सकाळी साडेदहा वाजता सुरू व्हायच्या आधी सुमारे १५ मिनिटे चर्चा केली; परंतु इतर न्यायाधीश यावेळी उपस्थित नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. चेलमेश्वर यांना बरे वाटत नसल्यामुळे बुधवारी ही बैठक होऊ शकली नव्हती.१२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयात खटले कोणाकडे सुनावणीला द्यायचे यासह अनेक प्रश्नांची यादीच वाचून दाखवली होती, असे काही विषय आहेत की ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर परिणाम करतात, असेही हे चौघे म्हणाले होते. या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर चर्चा करणे, त्यांना प्रसिद्धी देणे व त्यांचे राजकियीकरण करण्यास प्रसारमाध्यमांना मनाई करावी, अशी मागणी करणाºया याचिकेवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ही याचिका न्यायालयाचे निबंधक सुनावणीसाठी यादीत समाविष्ट करतील त्यानंतरच त्याचा विचार केला जाईल, असे या न्यायपीठाने म्हटले.या याचिकेत तातडीने सुनावणी व्हावी, असे म्हटले आहे. १२ जानेवारीच्या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर चर्चा, त्यांचे राजकियीकरण व त्याला प्रसिद्धी देण्यास सर्वोच्च न्यायालयाची आणखी हानी टाळण्यासाठी प्रसारमाध्यमांना तात्काळ मनाई करावी, असे म्हटले होते.
चार वरिष्ठ न्यायमूर्तींशी सरन्यायाधीशांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 3:05 AM