नवी दिल्ली : खासकरून इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील काही जणांकडून केल्या जाणाऱ्या तद्दन बेजबाबदार पत्रकारितेबद्दल सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या लोकांचा आविर्भाव आपण सर्वांचे तारणहार असल्याचा व धर्मवेदीवरून प्रवचन केल्यासारखा असतो, असे तिखट भाष्य केले.भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्या कंपनीविषयी प्रसिद्ध केलेल्या एका वृत्ताबद्दल जय यांनी अहमदाबाद येथील न्यायालयात ‘दि वायर’ या आॅनलाइन प्रकाशनाविरुद्ध बदनामीची फिर्याद दाखल केली आहे. ती रद्द करण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ‘दि वायर’ने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.त्यावरील सुनावणीच्या वेळी त्यांनी या पक्षकाराबद्दल नव्हे तर एकूणच इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील काहींच्या बेजबाबदार बातमीदारीवर आक्षेप घेतला. न्या. मिस्रा म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील अनेकांनी आपण मनाला येईल ते प्रक्षेपित करू शकतो, असा ग्रह करून घेतला आहे. मनाला वाटेल ते कसे काय लिहिले जाऊ शकते? याला काही मर्यादा आहे की नाहीत? याला पत्रकारिता म्हणता येईल का?>जबाबदारीने वागण्याची अपेक्षान्या. मिस्रा म्हणाले की, माध्यमांच्या गळचेपीचा प्रश्नच येत नाही. अनेक वेळा असे प्रयत्न मी स्वत: हाणून पाडले आहेत. खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.
बेताल मीडियावर सरन्यायाधीश तीव्र नाराज, वाटेल तसे प्रसिद्ध करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:46 AM