नवी दिल्ली : सध्या काँग्रेस पक्षाच्या पुढच्या अध्यक्ष पदावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. कालपासून अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत अर्ज भरण्यावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर, दिग्वीजय सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावांची चर्चा झाली. तर दुसरीकडे देशातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद घ्यावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, आता राहुल गांधी अध्यक्षपद घेणार की गांधी परिवारातील अन्य सदस्य या पदावर येणार या संदर्भात अजुनही माहिती समोर आलेली नाही. अध्यक्षपदावरुन राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले असल्याची माहिती गहलोत यांनी दिली. गांधी परिवाराकडून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कोणही लढणार नसल्याची माहिती गहलोत यांनी दिली.
राहुल गांधींनी दिली एक व्यक्ती, एका पदाची आठवण
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल केरळ येथे भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.'मी त्यांना सर्वांची इच्छा मान्य करुन अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. पण त्यांनी ऐकले नाही. 'मी ठरवले आहे की गांधी परिवारातील एकही सदस्य पुढचा पक्षाचा अध्यक्ष होणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती मुख्यमंत्री गहलोत यांनी दिली.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांना गांधी परिवारातून पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे. गहलोत अजुनही राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. हे पद सोडण्यासाठी ते तयार नसल्याचे दिसत आहे. याअगोदर राहुल गांधी यांनी गहलोत दोन्ही जबाबदारी सांभाळू शकतील असं म्हटले होते, पण काल गांधी यांना एक व्यक्तीला एकच पद असं वक्तव्यामुळे गहलोत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
...तर तुम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री होणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं
काल राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर एक नेत एक पद संदर्भात वक्तव्य केले. 'आम्ही उदयपूरमध्ये ठरवले आहे, एक नेत एक पद, ही काँग्रेसची आचार संहिता आहे.मला विशावस आहे, सर्वजण या आचारसंहिता पाळतील असं गांघी म्हणाले होते. त्यामुळे आता अशोक गहलोत आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.