Assam Beef Ban : भाजपशासित आसाममध्येगोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, आज आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान आसाम मंत्रिमंडळाचा विस्तार 7 डिसेंबर रोजी होणार असल्येही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, गोमांस बंदीच्या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी पोस्ट केली आणि काँग्रेसला थेट आव्हान दिले. काँग्रेसने गोमांस बंदीचे स्वागत करावे किंवा पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे, असे हजारिका म्हणाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही दिवसांपू्र्वीच सांगितले होते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी त्यांना पत्र लिहून मागणी केल्यास ते आसाममध्ये गोमांस बंदी करण्यास तयार आहेत.
आसाममधील काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर नागाव जिल्ह्यातील समगुरी विधानसभा मतदारसंघात बीफ पार्टी आयोजित केल्याचा दावा केला होता. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाटी ही बीफ पार्टी आयोजित केल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर हिमंता यांनी हुसैन यांच्या वक्तव्याबाबत गोमांसबाबतच्या भूमिकेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते.
मी भूपेन बोरा यांना पत्र लिहून रकीबुल हुसैन यांच्याप्रमाणे गोमांसावर बंदी घालण्याचे समर्थन करत आहे का, असे विचारेन आणि त्यांची तयारी असल्यास गोमांसावर बंदी घालेन, असे म्हणाले होते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांनी गोमांस खाणे बंद करावे, मग सर्व प्रश्न सुटतील, असेही हिमंता सरमा म्हणाले होते.