- बलवंत तक्षक
चंडीगड : भारत-पाकिस्तान फाळणीच्या कालावधीत शहीद झालेल्यांचे स्मारक कुरुक्षेत्रमध्ये उभारले जाणार आहे. यासाठी पिपलीजवळ सुमारे २५ एकर जमीन निश्चित करण्यात आली असून, लवकरच निर्माण कार्य सुरू केले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, फाळणीच्यावेळी लाखो लोक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीमध्ये पंचनद स्मारक ट्रस्टतर्फे स्मारक उभारले जाईल. हे स्मारक देशस्तरावर ओळख निर्माण करील. फाळणीच्यावेळी एक कोटी वीस लाख लोक स्थलांतरित झाले होते व लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. आपल्याला पुढे जायचे असेल तर आपला समाज, संस्कृती, बोलीभाषेला लक्षात घ्यावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. फाळणीच्या वेळी शहीद झालेल्या १,२०० जणांवरील लघु चित्रपट यावेळी दाखविण्यात आला.
काय म्हणाले खट्टरहरयाणाच्या भूमीने फाळणीचे दु:ख जास्तच सहन केले, असे सांगून खट्टर म्हणाले की, पाकिस्तानमधून बेघर होऊन आलेले अनेक लोक याची साक्ष देतात. मी स्वत: अशा कुटुंबांमध्ये वाढलो आहे व त्यांचे दु:ख चांगले जाणतो. फाळणीचे दु:ख कधीच विसरले जाऊ शकत नाही.