शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 7:55 AM

जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

- शरद गुप्तानवी दिल्ली: बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे.

मुख्यमंत्री लवकरच राज्यपालांना पत्र पाठवून भाजपशी असलेले संबंध संपुष्टात आणतील. त्यानंतर राज्यात राजदच्या सहकाऱ्याने सरकारचे स्थापन करण्यात येईल. या सर्व घडामोडी कधीपर्यंत होतील, असे विचारले असता जदयूच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमधील श्रावण संपण्यापूर्वी म्हणजे ११ ऑगस्टपूर्वी हे होऊ शकेल. राज्यात भाद्रपद महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत. जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील काही दिवसांत राजद नेते तेजस्वी यादव व त्यांची बहीण मिसा यांच्या १७ ठिकाणांवर रेल्वे भरती घोटाळ्याबाबत सीबीआयने छापे टाकले होते. राजदचे म्हणणे आहे की, आता यानंतर केंद्र सरकारकडे राजद नेत्यांच्या विरोधात कोणतेही नवीन प्रकरण उरलेले नाही. त्यामुळे आता ईडी, सीबीआय किंवा आयकर खात्याची कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

असे आहे समीकरण

मागील विधानसभा निवडणुकीत २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत भाजपने ७४, राजदने ७५ व जदयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. एक पोटनिवडणूक जिंकल्याने व एआयएमआयएमचे ४ आमदार बरोबर आल्यानंतर राजदच्या सदस्यांची संख्या ८० झाली. त्याचप्रमाणे विकासशील इन्सान पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ७७ झाली. जदयूचेही आता ४५ सदस्य आहेत. डाव्यांचे १६ आमदार आहेत.

जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही

जदयूचा कोणीही सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी माहिती जदयू नेते व बिहारचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी दिली. याबाबत नितीशकुमार यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे. आरसीपी सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जदयूकडून कोण सहभागी होणार, याची चर्चा सुरू झाली होती; परंतु शिक्षणमंत्री म्हणाले की, भाजपशी संबंध बिघडल्याचा मुद्दा नाही. २०२४ च्या लोकसभा व २०२५ मधील विधानसभा निवडणुका भाजपबरोबर मिळून लढणार का, असे विचारले असता, ते म्हणाले की, आता आम्ही बरोबर आहोत. 

जदयू, राजदने आमदारांना पाटण्यात बोलावलेजदयू व राजदने आपापल्या आमदारांना तत्काळ पाटण्यात बोलावले आहे. यावरून राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे. हम पक्षानेही आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार व तेजस्वी यादव यांनी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

तेजस्वी घेणार निर्णयस्वत:बाबत सुरू असलेल्या प्रकरणांच्या  पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनाच निर्णय घ्यायचा आहे की, सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नाहीत.

नाराजीचे हे आहे कारणविधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीने भाजप नव्हे, तर केवळ जदयू उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यामुळे जदयूची ताकद मागील निवडणुकीच्या ७१वरून ४३ आमदारांवर आली. त्याचबरोबर भाजपची ताकद ५३ वरून ७४ झाली. चिराग यांनी भाजपच्या सांगण्यावरून हे काम केले, असे नितीशकुमार मानतात. त्यामुळे आता ते भाजपला धडा शिकवू इच्छित आहेत.

बिहार मध्यावधी निवडणुकीकडे?

बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये अंतर्गत धुमशान वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मध्यावधी निवडणुकीकडे जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी जदयूला रामराम केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. नितीशकुमार हे सातजन्मात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जदयू म्हणजे बुडणारे जहाज आहे, असेही ते म्हणाले. आरसीपी सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षात बंडखोरीचा बिगुल वाजू शकतो. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा