फरीदाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 33 व्या आंतराराष्ट्रीय कला महोत्सव 2019 कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. हरियाणातील फरिदाबादच्या सुरजकुंड येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव भरविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. श्रीलंकेशी श्रीरामांचे नाते असून तेथील रामायण महोत्सवाप्रमाणे हा महोत्सव करणार असल्याचंही ते म्हणाले.
सुरजकुंड या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मंत्री रामविलास शर्मा आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हेही उपस्थित होते. या आंरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्र सरकारने अपना घर या कला स्थळाला भेट दिला. तेथील मराठीजनांनी संवाद साधून महाराष्ट्राने उभारलेली कलाकृतीही पाहिली. या कला महोत्सवात महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शनही घेतले. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमवेत रायगडावर सेल्फीही काढला.
हरियाणाची या कला महोत्सवाच्या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण फेस्टीव्हल भरवणार असल्याची घोषणा केली. सध्या, थायलंड, कंबोडिया, फिलिपिन्स, श्रीलंका या ठिकाणी असा महोत्सव भरविण्यात येत आहे. त्यापैकी श्रीलंकेशी श्रीरामांचं नात असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.