शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार; भाजप, काँग्रेस संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 8:29 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत  मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून सुनील जाखड बाहेर पडले आहेत. ते निवडणूक लढविणार नाहीत आणि प्रचारही करणार नाहीत.

हरीश गुप्तानवी दिल्ली : पंजाबमधील दोन प्रमुख पक्ष  संभ्रमात असल्याने  काँग्रेस आणि भाजपने  अद्याप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले असून सुखबिर सिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी अकाली दल निवडणूक लढविणार आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत  मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून सुनील जाखड बाहेर पडले आहेत. ते निवडणूक लढविणार नाहीत आणि प्रचारही करणार नाहीत. ते स्वित्झर्लंडमध्ये सुटी  घालवीत  असल्याने  मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू  या दोघांना आपसात काय ते ठरवायचे आहे. कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अमृतसर भेटीदरम्यान स्पष्ट करून या मुद्याला कलाटणी दिली. चन्नी हे या शर्यतीत बाजी मारतील, असे मानले जाते. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सिद्धू सक्षम नसल्याचे म्हटले होते.

चेहरा ठरविताना संघर्ष करावा लागतोय...भाजपशी युती करणारा अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष आणि  सुखदेव सिंग ढिंढसा यांचा शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या पक्षालाही  मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवितांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने माजी केंद्रीय मंत्री विजय साम्पला यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा