नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी श्रीलंका आणि बांगलादेशसह अनेक शेजारी देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येण्याची शक्यता आहे, असे या प्रकरणाशी संबंधितांनी सांगितले.बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि मॉरिशसचे प्रमुख नेते पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केलेल्या परदेशी नेत्यांमध्ये असण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयाच्या प्रसिद्धी विभागाने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. विक्रमसिंघे यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. विक्रमसिंघे यांनी फोनवरून पंतप्रधान मोदींचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.
शेख हसीना यांच्याशी फोनवर चर्चापंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशीही फोनवर चर्चा करून त्यांना शपथविधी समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड', भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांना मोदींच्या शपथविधीला आमंत्रित केले जाणार आहे.
२०१९ मध्ये कोण आले होते?बिमस्टेक’ देशांचे नेते २०१९ मध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी होणार आहे.