नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्याशी आम आदमी पार्टीच्या २ आमदारांनी गैरवर्तन केल्याने खळबळ माजली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी आमदारांनी गैरवर्तन व धक्काबुक्की केल्याचा दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांचा आरोप आहे.दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे दिल्लीचे मुख्य सचिवअंशू प्रकाश यांनी याची तक्रारही केली.या प्रकारानंतर आयएएस अधिकारीसंपावर गेले असून, आमदार माफी मागणार नाहीत, तोपर्यंत काम न करण्याचापवित्रा संतप्त अधिकाºयांनी घेतला आहे.या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देशकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिले आहेत.भाजपा आणि काँग्रेसची टीकाहा आपचा ‘शहरी नक्षलवाद’ आहे. झाल्या प्रकारासाठी अरविंद केजरीवालांनी राजीनामा द्यावा.- मनोज तिवारी,अध्यक्ष, दिल्ली भाजपालोकहिताची कामे करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी मुख्य सचिवांवर हात उचलण्यापर्यंत आमदारांची मजल गेली आहे. अरविंद केजरीवालांनी या गुंडगिरीबद्दल माफी मागावी.- अजय माकन,अध्यक्ष, दिल्ली काँग्रेसकेजरीवाल सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या जाहिरातींसंदर्भात बैठकीत वाद झाल्याचे वृत्त आहे. ‘आप’ने मात्र, रेशन कार्डच्या वाटपासंदर्भात बैठक बोलावली असल्याचे स्पष्टीकरण दिले. बैठकीत मुख्य सचिवांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. आपण नायब राज्यपालांना उत्तरदायी आहोत, असे सांगितले. या उत्तरावरून वाद झाल्याचे ‘आप’कडून स्पष्ट करण्यात आले.मुख्यमंत्री कार्यालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बैठकीत वादावादी झाली, पण गैरप्रकार झाला नसल्याचे सीएमआने म्हटले आहे.आमदार प्रकाश जरवाल यांनी मुख्य सचिवांनी जातिवाचक शब्द उच्चारले, असा आरोप केला. याची तक्रारही त्यांनी दाखल केली आहे.
आमदारांची मुख्य सचिवास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:06 AM