तेलंगणातील वारंगल शहरातील एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या शहरात एका आठ वर्षीय मुलाचा चॉकलेट खात असताना मृत्यू झाला आहे. हे चॉकलेट या मुलाच्या वडिलांनी परदेशातून आणलेले होतं अशी माहिती आता समोर आली आहे. या धक्कादायक घटनेची तेलंगणामध्येच नाही, तर संपूर्ण देशभरात चर्चा होत असून हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सिंह असे या आठ वर्षीय मुलाचं नाव आहे. संदीप हा आपल्या वडिलांनी आणलेलं चॉकलेट खात होता. मात्र चॉकलेटचा एक तुकडा त्याच्या गळ्यात अडकला. संदीपला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. श्वास घेण्यासाठी मग संदीप तडफडू लागला. चॉकलेटचा तुकडा काढण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले.
खूप प्रयत्न केल्यानंतरही संदीपच्या गळ्यात अडकलेला चॉकलेटचा तुकडा गळ्याच्या खालीही सरकला नाही आणि तो तोंडातून बाहेरही आला नाही. संदीपची बिघडत चाललेली स्थिती पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले.
मुलाच्या अन्ननलिकेत अडकला 5 रुपयांचं नाणं
तेलंगणामध्ये अशीच एक घटना घडली होती. याच वर्षी जूनमध्ये उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे घडली होती. तेथील कर्वी येथील आनंद किशोर चौधरी यांच्या चार वर्षीय चिमुकल्याच्या अन्ननलिकेत पाच रुपयांचं नाणं अडकलं होतं. चार वर्षीय मुलाला घेऊन त्याचे आईवडील सतत तीन दिवस डॉक्टरांकडे जात होते. तरीही डॉक्टर मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेला पाच रुपयांचं नाणं बाहेर काढू शकले नाहीत.
मुलाला मध्य प्रदेशातील सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे बालरोग तज्ज्ञांनी या मुलाच्या अन्ननलिकेत अडकेलं पाच रुपयांचं नाणं बाहेर काढून कुटुंबीयांना दिलासा दिला. या मुलाने खेळता खेळता नाणं गिळून टाकलं होतं. यानंतर मुलाचा गळा दुखू लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"