नवी दिल्ली - लहान मुलांना ऑनलाईन गेमचं अक्षरश: वेड लागलं आहे. या गेमच्या नादामुळे मुलं वेगवेगळे कारनामे करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेम खेळणं एका मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. गेमचा नाद जीवावर बेतला असून शाळेच्या गेटवरून उडी मारताना लोखंडी रॉड मुलाच्या पोटात घुसल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडच्या कोरबामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. मोबाईलवर फ्री फायर ऑनलाईन गेम (Online Game) खेळत असलेल्या मुलाने शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारली. मात्र उडी मारताना चूक झाल्याने त्याच्या पोटात मुख्य गेटवर बसवलेला लोखंडी रॉड घुसला.
शाळेच्या परिसरात उपस्थित असलेले लोक मुलाला मदत करण्यासाठी पोहोचले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाला होता. राहुल वैष्णव असं या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो इयत्ता नववीत शिकत होता. शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर बसून मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाने अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो मुख्य गेटमध्ये लावलेल्या टोकदार लोखंडी रॉडवर पडला. रॉड पोटातून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल त्याच्या तीन मित्रांसह सरकारी शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर चढून मोबाईलवर गेम खेळत होता.
ऑनलाईन गेम खेळणं पडलं चांगलंच महागात
मित्रांच्या मते, अचानक जोरदार गडगडाटासह पाऊस सुरू झाला. भिजण्यापासून वाचण्यासाठी राहुलने सहा फूट उंच लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो गेटमधील धारदार रॉडवर पडला आणि रॉड त्याच्या पोटातून गेला. राहुलच्या मित्रांनी पोटात घुसलेल्या गेटच्या रॉडमधून त्याला कसा तरी बाहेर काढून घरात आणले. राहुलची अवस्था पाहून त्याची आई राधिका बेशुद्ध पडली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई
बिहारमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचं उघड झालं आहे. विद्यार्थिनीची छेड काढणं मुख्याध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी ही घटना समोर आल्यानंतर त्याची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आपल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुख्याध्यापकाला अटक करण्यात त्यांना यश आलं आहे.