रांची - देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच झारखंडमधील चकुलिया येथील पोचपनी परिसरात मुले नक्षलवाद्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन शाळेत जातात. देशातील सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी सरकारकडून सर्व शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. मात्र झारखंडमध्ये या अभियानाच्या मार्गात नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जात आहेत. नक्षलवाद्यांच्या या दहशतीमुळेच शालेय विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी धनुष्यबाण घेऊन शाळेत जावे लागते. शाळेत जाताना या मुलांना जंगल पार करावे लागते. या भागात मुलांनी नक्षलवाद्यांना पाहिले होते. त्यामुळे ही मुले धनुष्यबाण घेऊन शाळेत जातात, असे स्थानिकांनी सांगितले.
नक्षलवाद्यांची दहशत : येथे मुलांना पाटी-पेन्सिलीबरोबर धनुष्यबाण घेऊन जावं लागतं शाळेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 4:21 PM
देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे.
ठळक मुद्देदेशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो नक्षलवाद्यांच्या या दहशतीमुळेच शालेय विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी धनुष्यबाण घेऊन शाळेत जावे लागते