नवी दिल्ली: देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम(vaccination program) राबवली जात आहे. दररोज लाखो लोकांना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस दिला जातोय. पण, अद्याप लहान मुले, म्हणजेच 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. पण, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून झायडस कॅडिलाची कोरोना व्हॅक्सीन (Zydus Cadila Vaccine) 12-18 वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते.
लसीकरणासंबंधी एका जाणकारांच्या समितीच्या प्रमुखाने हे संकेत दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. पण, या बातमीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. झायडस कॅडिलाच्या लसीचे लहान मुलांवरील परिणाम सप्टेंबरच्या आधी समोर येतील. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ( National Expert Group on Vaccine) चे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी ही माहिती दिली आहे . एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरोरा म्हणाले की, आपातकालीन वापरासाठी झायडस कॅडिलाच्या लसीला येत्या काही आठवड्यात परवानगी मिळू शकते.
लवकरच लोव्हॅक्सीन उपलब्ध होणारझायडस कॅडिलासह भारतात लहान मुलांसाठी(2-12 वयोगट) भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन(Covaxin)देखील लवकरच उपलब्ध होऊ शकते. कोव्हॅक्सीनचे फेज 3 ट्रायल सुरू झाले आहेत आणि हे ट्रायल्स सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत 2 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण देशात सुरू होऊ शकते.
हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेजची तयारीदरम्यान, देशाचे नवीन आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी पदभार स्विकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार एक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज आणत असल्याची माहिती दिली. त्या अंतर्गत देशातील 736 जिल्ह्यांमध्ये पेडियाट्रिक सेंटर बनवले जातील. या अंतर्गत 4000 आयसीयू बेड मुलांसाठी तयार केले जातील. हे पॅकेज येत्या 9 महिन्यांच्या आत लागू होईल.