शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:28 PM

आज विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बोलताना लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली.

देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली असून आज इंडियाची बैठक मुंबईत झाली. यावेळी विरोधी पक्षांनी मोदी सरकावर टीका केली. बिहारचे नेते माजी मंत्री लालू यादव यांनी पंतपधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

लालू प्रसाद यादव म्हणाले, जर देशात विरोधी पक्ष एकवटला नाही आणि एकही उमेदवार उभा राहिला नाही तर त्याचा फटका देशाला सहन करावा लागेल. याचाच फायदा आतापर्यंत मोदींना झाला. देशातील महागाईवरुनही केंद्रावर टीका केली. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. देशात गरिबी वाढत आहे. यांच्या राज्यात टोमॅटोला चव राहिलीच नाही. या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. भाजपच्या १५ लाखाच्या त्याच जुन्या घोषणेवर टीका केली.

लालू प्रसाद यादव म्हणाले, 'हे लोक म्हणजे भाजप खोटे बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले आहेत. माझे आणि इतर अनेकांचे नाव घेत त्यांनी त्यांचे पैसे स्विस बँकेत असल्याचे सांगितले होते. आम्ही हे पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करू, असे मोदींनी सांगितले होते.''भाजपच्या या आश्वासनाने आमचीही फसवणूक झाली आहे. आणि आम्ही आमचे खाते देखील उघडले, असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला. 

लालू प्रसाद यादव यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचाही उल्लेख केला. त्याचबरोबर आपल्यावर अनेक ऑपरेशन्स झाल्या आहेत, आपली किडनी ट्रान्सप्लांट झाली आहे आणि आपली हिंमत अजून बुलंद आहे आणि मोदी आणि भाजपला हटवूनच आपण थांबणार असल्याचे यादव म्हणाले.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा