नवी दिल्ली : शाळांना सुट्या असतानाही विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजन देण्याची व्यवस्था करणे शक्य आहे का हे शोधले जात आहे.शाळांच्या सुट्यांमध्येही आम्ही गरिबातील गरीब विद्यार्थ्याला माध्यान्य भोजन देण्यासाठी काही पुढाकार घेण्यावर विचार करू शकतो, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या विशेष सचिव रिना राय यांनी सांगितले.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ च्या अंमलबजावणी परिषदेत रिना राय येथे बोलत होत्या. झारखंडमध्ये एका मुलीचा (११) उपासमारीमुळे नुकताच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माध्यान्य भोजन या मुलीला नाकारण्यात आलेले नव्हते. शाळांना सुट्या असल्यामुळे तिला ते मिळू शकले नाही व त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे अधिकाºयाने सांगितले.
सुट्यांमध्येही मुलांना माध्यान्य भोजन?, मनुष्यबळ विकास मंत्रालयाची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:23 AM