Bhopal Hospital Fire : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग, तीन बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:30 AM2021-11-09T00:30:56+5:302021-11-09T00:31:17+5:30

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ...

childrens ward of kamla nehru hospital in bhopal mp catches fire some died Shivraj Singh Chouhan | Bhopal Hospital Fire : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग, तीन बालकांचा मृत्यू

Bhopal Hospital Fire : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला आग, तीन बालकांचा मृत्यू

Next

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला सोमवारी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच ही घटना दुर्देवी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

"भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डला लागलेली आग ही दु:खद आहे. बचाव कार्य तेजीनं पूर्ण करण्यात आलं आहे. प्रशासनाची टीम घटनास्थळी उपस्थित असून मीदेखील या घटनेची माहिती घेत आहे," असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. ही घटना अतिशय दुर्देवी असून बचाव कार्यही तेजीनं पूर्ण करण्यात आलं. या घटनेच्या उच्च स्तरिय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहे. मोहम्मद सुलेमान हे या घटनेचा तपास करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.


यादरम्यान बचाव कार्य तेजीनं पूर्ण करण्यात आलं असलं तरी या ठिकाणी गभीररित्या आजारी असल्यामुळे दाखल करण्यात आलेल्या तीन बालकांना दुर्देवानं वाचवता आलं नाही. या घटनेचं आम्हाला दु:ख आहे. या बालकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे होवोत हिच इच्छा असल्याचंही ते म्हणाले.

Web Title: childrens ward of kamla nehru hospital in bhopal mp catches fire some died Shivraj Singh Chouhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.