शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 7:59 PM

दोन्ही देशांच शांततेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, असे असतानाही चीन एलएसीवर सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे आणि सैन्याची जमवाजमव करत आहे....

ठळक मुद्देफिंगर 8पर्यंत भारताचा दावा आहे. मात्र सध्याचा तणाव पाहता, चीन पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय जवानांना फिंगर 4वरच अडवत आहे.लष्कराने जे स्ट्रक्चर्स उखडून फेकले, ते चीनने पुन्हा तयार केले चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारतही लद्दाखमध्ये आपली ताकद वाढवत आहे.

लेह :भारत आणि चीनदरम्यान 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे दोन्ही देशांच शांततेसाठी चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे एलएसीवर चीन सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे आणि सैन्याची जमवाजमव करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंगाँग त्सो सरोवरासह फिंगर्स भागाच्या जवळपास चीनने आपले सैन्य वाढवले आहे. याशिवाय वादग्रस्त भागांत चीनचे बांधकामही सुरूच आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिंगर 8पर्यंत भारताचा दावा आहे. मात्र सध्याचा तणाव पाहता, चीन पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय जवानांना फिंगर 4वरच अडवत आहे. फिंगर्स भागात चीन आक्रामकपणे अनेक नव्या भागांवर नियंत्रण मिळवत आहे. सूत्रांनी सांगितले, की गलवान नदी भागातील हिंसक संघर्षानंतरही चीनने आपले अनेक स्ट्रक्चर्स उभे केले आहेत. 

लष्कराने जे स्ट्रक्चर्स उखडून फेकले, ते चीनने पुन्हा तयार केले - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी 15-16 जूनला पेट्रोलिंग पॉइंट 14च्या जवळील जे स्ट्रक्चर्स उखडून फेकले होते, ते चीनने पुन्हा तयार केले आहेत. याबरोबरच दौलत बेग ओल्डी सेक्टरच्या अगदी समोरच्या भागातही भारताच्या पेट्रोलिंग पॉइंट 10 ते 13 मध्येदेखील चिनी सैन्य अनेक अडथळे आणत आहे. 

फायटर जेट्सने दाखवली ताकद -चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारतही लद्दाखमध्ये आपली ताकद सातत्याने वाढवत आहे. लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांनीही आज या भागाचा दौरा केला. याच बरोबर लडाखच्या आकाशात भारतीय हवाई दलाचे फायटर जेट्सदेखील दिसून आले. लेह येथील मिलट्री बेसवरून बुधवारी अनेक भारतीय जेट्सनी आकाशात झेप गेतली आणि 240 किलोमीटर दूरवर असलेल्या सीमा रेषेपर्यंत दौरा केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

 

...म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं झुकला चीन! 50 दिवसांच्या संघर्षानंतर 'मजबूर'

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानIndiaभारत