नवी दिल्लीः चीनमधून भारतात परतलेल्या पाच नागरिकांमध्ये कोरोना वायरस संक्रमण झाल्याची लक्षणं आढळून आली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्या पाचही जणांमध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणं दिसल्यानंतर उपचारासाठी हरिणायातल्या मानेसर स्थित क्वारंटाइन फॅसिलिटी बेसच्या हॉस्पिटल हलवलं आहे. त्या पाच रुग्णांच्या रक्ताचे नमुने दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसची लागण झालेली असल्यास सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होण्यासारखे प्रकार नजरेस पडतात.
चीनमध्येकोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असून, चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे 361 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तर 9692 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. कोरोनाची लागण झालेला हा केरळमधील तिसरा रुग्ण सापडला होता.