हैदराबाद - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 1000 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 42 हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. सोमवारी कोरोनामुळे आणखी 108 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, 2478 नवी प्रकरणे समोर आली आहेत. वेगाने परसणाऱ्या या व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. साध्या तापाला कोरोना व्हायरस समजून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील एका 50 वर्षीय व्यक्तीने साध्या तापाला कोरोना व्हायरस समजून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (11 फेब्रुवारी) गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या पत्नी आणि मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. के. बाला कृष्णाहद असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून ते चित्तूर येथील रहिवासी आहेत.
कृष्णा यांना काही दिवसांपासून ताप येत होता. याच दरम्यान त्यांनी इंटरनेटवर कोरोना व्हायरस संदर्भातील एक व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर आपल्याला याच व्हायरसची लागण झाली असल्याचं त्यांना वाटू लागलं होतं. मंगळवारी कुटुंबियांना घरात बंद करुन ते स्मशानात त्यांच्या आईच्या कबरीजवळ निघून गेल्याची माहिती कृष्णा यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. कुटुंबियांनी आरडाओरड करत शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
कृष्णा यांनी त्यांच्या आईच्या कबरीजवळ असलेल्या एका झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टरांनी कृष्णा यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अहवालात त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. कृष्णा यांना केवळ साधा ताप आला होता असं डॉक्टरांनी सांगितलं अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे. आंध्र प्रदेशात आतापर्यंत कोरोना व्हायरसशी संदर्भात एकही रुग्ण आढळलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results : आपच्या आठ महिलांनी मिळवला शानदार विजय अन् पोहोचल्या विधानसभेत
दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र
Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
Delhi Election : आपच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्याचा मृत्यू
Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी