तिरुवनंतपुरम - चीनमध्येकोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे 361 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तर 9692 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. कोरोनाची लागण झालेला हा केरळमधील तिसरा रुग्ण आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'केरळच्या कासारगोडमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. तिसऱ्या रुग्णावर कासारगोडमधील कांजनगड जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील विशेष विभागात त्याला ठेवण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. केरळमध्ये याआधीही कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला होता. काही दिवसांपूर्वी हा रुग्ण चीनच्या वुहान शहरातून परतला होता.'
फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. कोरोना व्हायरसनंतर आता चीनला बर्ड फ्लूचा धोका आहे. एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हुनान प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाला असला तरी अद्याप कोणत्याही व्यक्तीमध्ये एच5एन1 हे व्हायरस आढळले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हुबेई प्रांतच्या स्थानिक आरोग्य विभागाने सोमवारी याची माहिती दिली आहे.
चीनमध्ये पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याच्या घटना घडल्या आहेत. याचे अनेक धक्कादायक फोटो देखील समोर आले आहेत. फोटोमध्ये पाळीव प्राणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. चीनमधील लोक आपल्या इमारतीतून कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी फेकून देत असल्याचं सांगितलं जात आहे. शांघाईमध्ये 5 मांजरींना घरातून बाहेर फेकून दिले आहे. या प्राण्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारताने चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा तात्पूरती थांबवल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर तात्पूरती बंदी घातली आहे. 'सध्याच्या घडामोडींमुळे ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनचे पासपोर्टधारक आणि चीनमध्ये राहणारे अन्य देशाचे नागरिक यांना ही बंदी लागू असणार आहे. ज्यांना यापूर्वीच ई-व्हिसा मिळाला आहे, त्यांचा ई-व्हिसा वैध नसेल असं दूतावासाने जाहीर केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मनसेच्या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आता या मार्गावरून निघणार मोर्चा
आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला
'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग
महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य