भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. भारताने जगात इतिहास रचला आहे. अजुनही जगात कोणत्याही देशाने दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलेले नाही. यासह भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीननेही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. चंद्रयान-3 च्या यशानंतर जागतिक मीडियामध्ये भारताचे कौतुक होत आहे. मात्र, अंतराळात भारताचे यश चिनी माध्यमांचा तिळपापड झाला आहे. चंद्रयानच्या यशामागे दडलेल्या उणिवा मोजण्यात या ना त्या मार्गाने चिनी माध्यमे गुंतलेली आहेत.
ब्रिटनमध्ये हवाई प्रवास ठप्प! विमाने लँड किंवा टेक ऑफ करू शकत नाहीत; तांत्रिक दोष असल्याची माहिती
काही दिवसापूर्वी, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला आहे, यामध्ये जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत भारत आणि चीनची तुलना करताना भारताला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या लेखात असे म्हटले आहे की, चंद्रयान-3 चे लँडिंग देखील विशेष आहे कारण ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मोहिमेशी देखील जोडलेले आहे. नरेंद्र मोदी सरकारचे स्वप्न हे आहे की भारताला जगातील तंत्रज्ञानातील नवनिर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र बनवायचे आहे. नरेंद्र मोदी सरकारला आशा आहे की अशा प्रकारे अंतराळ मोहिमेच्या यशामुळे भारताचे उत्पादन क्षेत्र पुढे जाईल, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.
भारत सरकारने या वर्षी भारतीय अंतराळ धोरण २०२३ लाँच केल्याचे लेखात म्हटले आहे. अंतराळ प्रक्षेपण बाजारपेठेतील आपला हिस्सा २ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. चंद्रयान-3 देखील याच धोरणाचा एक भाग होता, ज्याच्या यशामुळे भारताचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. लेखात पुढे म्हटले आहे की, "चंद्रयान-3 च्या यशाचा अर्थ असा नाही की, त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकेल. भारताला या वस्तुस्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे की त्यांचे गंतव्यस्थान अजून दूर आहे."
पाश्चात्य देशांमधील चीन आणि रशिया यांच्यातील मतभेदांचा फायदा घेत भारत अंतराळ क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे आणि स्वतःला उपग्रह प्रक्षेपण करणारा एक प्रमुख प्रदाता म्हणून वर्णन करतो. भारताला सध्या चीनशी बरोबरी साधणे सोपे नाही, असंही यात म्हटले आहे.
यूएस थिंक टँकचा हवाला देत, असे सांगण्यात आले की मार्च २०२० पर्यंत अंतराळ क्षेत्रात चीनचा वाटा १३.६ टक्के होता आणि भारताचा वाटा फक्त २.३ टक्के होता. २०२२ मध्ये चीनने ६४ उपग्रह प्रक्षेपित केले, तर भारत फक्त ५ उपग्रह सोडू शकला. याआधीही भारतीय रॉकेटला विश्वासार्हतेच्या मुद्द्यावरून अनेकदा घेरले आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय रॉकेटच्या यशाचा दर ७० टक्के आहे.