चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA)ने अरुणाचल प्रदेशमधील 5 अपहृत तरुणांना भारताकडे सोपवलं आहे. भारतीय सैन्याशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सर्व तरुणांना चीनहून भारतात पाठविण्यात आले. अरुणाचल प्रदेशातून पाचही तरुणांना चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते, त्यानंतर आता त्यांना सोडण्यात आले आहे.याआधी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) शनिवारी अरुणाचल प्रदेशातील पाचही अपहृत तरुणांना भारताकडे सोपवेल. पीएलएने यापूर्वीच सांगितले होते की, ते पाच भारतीय तरुण त्यांच्या ताब्यात आहेत. आता हस्तांतरणाच्या प्रक्रियेची कार्यपद्धती वापरली जात आहे.अपहरण झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना ही घटना शुक्रवारी जिल्ह्यातील नाचो भागात घडल्याचं सांगितलं. अपहरण केलेल्या तरुणांसोबत गेलेले दोन जण कसे-बसे पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलीस अधीक्षक तारू गुसर म्हणाले, मी या भागातील सत्यता पडताळण्यासाठी नाचो पोलीस ठाण्याचे प्रभारी पाठविले असून, त्वरित अहवाल द्यावा लागतो. चिनी सैन्याने अपहरण केलेल्यांची नावे टोच सिंगकम, प्रसात रिगलिंग, डोंगटू इबिया, तनु बकर आणि नागरू दिरी अशी असून, हे पाच जण तागिन समुदायाचे आहेत.
अरुणाचल प्रदेशमधून अपहरण केलेल्या पाच तरुणांची चीनकडून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 14:54 IST