नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या सीमवादामुळे भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर सीमेवर युद्धसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. चीनच्याही सैन्याला मोठी हानी झाली होती. हा तणाव निवळला असून चीनच्या सैन्याने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या चर्चेनंतर माघार घेतली आहे. यानुसार चीनचे सैन्य़ दीड किमी हटले आहे. यानंतर भारतीय सैनिकही दीड किमी मागे हटले आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेला भारतीय लष्करातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे एनएसए अजित डोवाल यांच्यामध्ये झालेल्या परस्पर समझोत्यानुसार दोन्ही देशांचे सैन्य़ वादग्रस्त भागातून एक ते दीड किमी मागे हटणार आहे. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा पुन्हा दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. अजित डोवाल आणि चीनचे वांग यी यांच्यातील व्हिडीओ संभाषणानंतर चीनने लगेचच आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली होती.
भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्याने इंग्रजी वृत्तपत्र ''द हिंदू''ला दिलेल्या माहितीनुसार भारताने पेट्रोलिंग पॉईंट 14 पर्यंत रस्ता बनविला आहे. या ठिकाणीच दोन्ही सैन्यादरम्यान हिंसक घटना घडली होती. येथूनच भारत पेट्रोलिंगला सुरुवात करत होता. आता या क्षेत्रामध्ये 3.5 ते 4 किमी च्या परिसराला बफर झोन घोषित करण्यात आला आहे. यामुळे या भागात दोन्ही देशांचे केवळ 30 सैनिक तैनात राहू शकतात. दोन्ही बाजुच्या सैन्याकडून हे अंतर निश्चित करण्यात आले आहे. यानंतरच्या 1-1 किमीच्या अंतरावर दोन्ही बाजुते 50-50 सैनिक राहू शकणार आहेत. म्हणजेच 6 किमीच्या पट्ट्यामध्ये भारताचे 80 आणि चीनचे 80 सैनिक तैनात राहणार आहेत.
डोवाल यांची चीनशी चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आज चिनी सैन्य दीड किलोमीटरपर्यंत मागे सरकलं. त्यामुळे डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा फलद्रूप ठरल्याचं म्हटलं जात आहे. डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा अतिशय सौहार्दपूर्ण होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. भविष्यात पुन्हा गलवानसारखी घटना होऊ नये यासाठी शांतता राखण्याबद्दल दोघांनी चर्चा केली. या चर्चेचा परिणाम आज दिसला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच
विद्यापीठांच्या परिक्षांची घोषणा झाली, या महिन्यात होणार; यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी