शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

चीनची पुन्हा घुसखोरी, सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचे दोन बंकर केले उद्ध्वस्त

By admin | Published: June 26, 2017 7:58 PM

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 26 - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चिनी सैनिकांनी सिक्कीममध्ये भारतीय नियंत्रण रेषा ओलांडून भारताचे दोन बंकर उद्ध्वस्त केले आहेत. मात्र भारतीय लष्करानं 10 दिवस त्यांना घेराव घालून रोखलं आहे. चीननं कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जाणा-या भाविकांनाही थांबवलं आहे. चिनी सैनिकांनी सिक्कीम, भूटान आणि तिबेटच्या सीमेवरील डोका ला येथे घुसखोरी केली आहे. 2008मध्येही चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत भारताचे बंकर उद्ध्वस्त केले होते. डोका ला भागातल्या लालटेन भागात चिनी सैनिकांनी भारतावर कुरघोडी करण्याच्या दृष्टीनं ही कारवाई केली आहे. भारतात घुसखोरी करण्यापूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची एक बैठकही झाली होती. मात्र 20 जून रोजी झालेल्या या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांना रोखण्यासाठी भारतीय लष्करानं मानवी साखळी बनवली आहे. काही भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे व्हिडीओसुद्धा बनवले आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी लागोपाठ भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र भारतीय लष्करानं त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषे(एलएसी)वर रोखून धरलं आहे.