नवी दिल्ली: पूर्व लडाखमधीलभारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठक पार पडली. या बैठकीत शांततापूर्ण सीमा वाद सोडवण्यासाठी चीनने तयारी दर्शवली आहे.
परराष्ट्रीय मंत्रालयाने सांगितले की, द्विपक्षीय करारानूसार सीमाभागातील निर्माण झालेली परिस्थिती शांततेने सोडवण्यास चीन तयार आहे. दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील अतिशय शांत वातावरणात झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लष्करी व डिप्लोमेटिक लेवलवर चीनशी चर्चा यापुढे देखील सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र लडाखमधील सीमेवर दोन्ही देशांतील मोठ्या संख्येने सैन्य जमले आहे. त्यांना परत बोलावण्याबाबत काही निर्णय झाला की नाही हे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं नाही. परंतु सीमावादवरुन भारत आणि चीनधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे.
तत्पूर्वी, पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा वाद सुरू आहे. लडाखने एलएसीवर रस्ता बांधकाम करण्याचे काम सुरु केले होते. त्याला चीनने विरोध केला. यानंतर 5 मे रोजी पँगोंग तलावावर दोन्ही देशांचे सैनिक आपापसात भिडले. या चकमकीत काही सैनिकही जखमी झाले. यानंतर चीनने या भागात आपल्या सैनिकांची तुकडी वाढविली. तसेच, चीनने सैन्य तैनात करण्याबरोबरच त्यांनी तंबूही बांधले.
भारतीय लष्कराच्या जवानांनी एलएसीवरील चीनच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानही एलएसी सीमेवर तैनात राहिले. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत, असे सांगण्यात येते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दिलासादायक! कोरोनाचं कंबरडं मोडणारं औषध; 'या' झाडापासून बनणारा रस रुग्णांसाठी संजीवनी
सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा
...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप
जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!