चीनच्या (China) कुरापती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत आहे. चीन आपल्या शेजारी असलेल्या देशांवर बारीक नजर ठेवतो आणि वेळोवेळी कारवाई करत असतो. यावेळी चीनने आपले एक गुप्तहेर जहाज (Spy Ship) हिंद महासागरात (Indian Ocian) पाठवले आहे. भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनने हे गुप्तहेर जहाज हिंदी महासागरात पाठवले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीय नौदलाला (Indian Navy) याबाबत सतर्क करण्यात आले आहे. यामागे चीनचा हेतू काय आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय नौदल चीनच्या हेरगिरी जहाजावर लक्ष ठेवून आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे जहाज हिंदी महासागरात असले तरी ते भारताच्या सागरी सीमेपासून दूर आहे. असे असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय नौदलाचे अनमँड एरियल व्हेईकल (Unmanned Aerial Vehicle) चीनच्या हेरगिरी जहाजावर सतत लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, आपल्या शेजारी असलेल्या देशांवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने यापूर्वीही अशी कृत्ये केली आहेत. याशिवाय, उपग्रह प्रक्षेपणावर लक्ष ठेवण्यासाठी चीनही अशी जहाजे पाठवत असतो. मात्र, यावेळी चीनकडून हे जहाज हिंदी महासागरात पाठवण्यामागचा उद्देश कळू शकलेला नाही. विशेष म्हणजे, भारताचे हिंदी महासागराशी मजबूत आर्थिक, राजकीय आणि सामाजिक संबंध आहेत. भारताची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात या हिंदी महासागरातूनच होते. पण भारतासह इतर देशांनी हिंदी महासागरातून व्यापार करणे चीनला आवडत नाही. हिंदी महासागरातून मुक्त व्यापाराला चीनचा विरोध आहे.
याचबरोबर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह अनेक देश हिंदी महासागरात मुक्त व्यापाराच्या बाजूने आहेत. रशिया आणि चीनने अंटार्क्टिकाभोवतीच्या तीन विशाल महासागरांचे अतिमासेमारीपासून संरक्षण करण्यासाठी युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर 23 देशांनी समर्थित योजना पुन्हा थांबवल्या आहेत. रशियाची क्षमता आणि चीनच्या हस्तक्षेपामुळे अनेक देशांना समस्या निर्माण होत आहे. कारण कधी-कधी दोघेही एकमत होण्यापूर्वी व्हीटो करतात.