नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पात संरक्षण तरतुदीत गतवर्षीच्या तुलनेत १२.५ टक्के वाढ करीत २ लाख २९ हजार कोटी रुपये (३८ अब्ज डॉलर) केली असली तरी अद्यापही चीनच्या संरक्षण बजेटच्या तुलनेत भारत बराच पिछाडीवर आहे़ चीनची संरक्षण तरतूद भारतापेक्षा ३़५ टक्के अधिक आहे़भारतीय सैन्य दलांसाठी गतवर्षीच्या २़०३ लाख कोटींच्या तुलनेत यावर्षी २़२९ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ याउलट चीनच्या सशस्त्र दलांसाठी यावर्षीसाठीची तरतूद सुमारे १३२ अब्ज डॉलर इतकी आहे़ भारतीय लष्कर या तरतुदीपैकी ९४५०० कोटी रुपये शस्त्रास्त्र प्रणालींच्या खरेदीवर खर्च करेल़ तर उर्वरित रक्कम वर्तमान संपत्तीचे व्यवस्थापन आणि वेतनावर खर्च केली जाईल़चीनने गत मार्च महिन्यात आपला अर्थसंकल्प सादर केला होता़ त्यात चीनने आपल्या संरक्षण तरतुदीत १२़२ टक्के वाढ करीत ती ८०८ अब्ज युआन (सुमारे १३२ अब्ज डॉलर) केली होती़ २०१३ मध्ये चीनची संरक्षण तरतूद ७२०़१९७ अब्ज युआन होती़ २०१२ च्या तुलनेत ती १०़७ टक्के अधिक होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
चीनची संरक्षण तरतूद भारताच्या तिप्पट
By admin | Published: July 13, 2014 11:46 PM