ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांची भूमी म्हटल्यामुळे चीनला पाकिस्तानचा पुन्हा पुळका आला असून त्यांचा चांगलाच संताप झाला आहे.
पाकिस्तानचा बचाव करताना, कोणत्याही देशाला किंवा धर्माला दहशतवादाशी जोडण्यास आमचा विरोध आहे असं चीनने म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्री हुआ चुनयींग यांनी सोमवारी हे वक्तव्य केले.
पाकिस्तानने दहशतवादविरोधात मोठे योगदान दिले आहे, संपूर्ण जगाने पाकिस्तानच्या बलिदानाचा सन्मान केला पाहिजे अशी मुक्ताफळेही चुनयींग यांनी उधळली .
भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी आहेत.भारताची चिंता आम्ही समजतो. मात्र, चर्चा करून दोन्ही देश आपापसातील मतभेद मिटवतील अशी आम्हाला आशा आहे असं देखील त्या म्हणाल्या.